ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज सॅम कॉन्स्टन्स भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आला. आपल्या कामगिरीपेक्षाही मालिकेत घातलेल्या वादांमुळे तो अधिक चर्चेचा विषय ठरला. सॅमने भारताविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली, परंतु या मालिकेदरम्यान तो विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसह घातलेल्या वादामुळे तसेच इतर भारतीय खेळाडूंबरोबरच्या वादामुळे चर्चेत होता. आता सॅमबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना एका चाहत्याने मोठी चूक केली आणि त्यानंतर त्याच्या कारला टक्कर बसली.
सॅम कॉन्स्टासने मेलबर्नमध्ये भारताविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान पदार्पण केले आणि या १९ वर्षीय खेळाडूने नॅथम मॅकस्विनीची जागा घेतली आणि पदार्पणाच्या सामन्यात ६० धावांची झटपट खेळी खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारताविरुद्धच्या शानदार पदार्पणानंतर कॉन्स्टासने ऑस्ट्रेलियात इतकी लोकप्रियता मिळवली की त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी एका चाहत्याचा कार अपघात झाला असता.
भलेही सॅम कॉन्स्टास हे नाव सर्वांसाठी नवीन होतं पण भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियात तो चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कॉन्स्टास बॅग घेऊन रस्त्यावरून चालताना दिसत आहे. काही वेळाने, एक चाहता त्याची कार चालवत येतो आणि त्याला कॉन्स्टासबरोबर सेल्फी घ्यायचा असतो. या प्रयत्नात घाईघाईत तो त्याची कार थांबवून पार्क करतो, पण ती बंद करायला विसरतो.
हेही वाचा – INDW vs IREW: प्रतिका रावलचा वर्ल्ड रेकॉर्ड, आजवर कोणत्याच महिला फलंदाजाला जमली नाही अशी कामगिरी
हा चाहता कार बंद न करता घाईतच कारमधून उतरतो. पण त्यानंतर त्याची कार स्वतःहून पुढे जाऊ लागते आणि समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या कारला धडकते. मात्र, चाहत्याला त्याची कार पुढे जाताना दिसल्यावर तो पटकन कार जवळ जाऊन ती थांबवण्याचा प्रयत्न करतो, मात्र तोपर्यंत त्याची कार पुढे उभ्या असलेल्या कारला धडकते.
हेही वाचा – INDW vs IREW: ऐतिहासिक! भारताच्या महिला संघाने नोंदवला इतिहासातील सर्वात मोठा विजय, आयर्लंडचा उडवला धुव्वा
A costly attempt at a photo with Sam Konstas. ? #AUSvIND
— Herald Sun Sport (@heraldsunsport) January 15, 2025
(?: thunderbbl/IG) pic.twitter.com/mePkJlQ0D3
१९ वर्षीय युवा खेळाडू सॅम कॉन्स्टास सध्या बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे, जिथे तो सिडनी थंडरचे प्रतिनिधित्व करत होता. भारताविरूद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर, बिग बॅशच्या चालू हंगामात त्याने सिडनी थंडरसाठी २ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५७ धावा केल्या आहेत. यापैकी ५३ धावा फक्त एका सामन्यातील आहेत. आता पुढच्या सामन्यासाठी तो सराव करत आहे. तो सिडनी थंडरच्या सराव सत्रासाठी जात असतानाच चाहत्याबरोबर फोटो काढण्याची घटना घडली.