मेलबर्न : ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटी सामन्यासाठी पदार्पणाची संधी दिलेला १९ वर्षीय सॅम कोन्सटास प्रतिभावान खेळाडू असून, त्याच्याकडे प्रतिभेनुसार खेळण्याची क्षमता आहे. पण, यानंतरही त्याचे पदार्पण तेवढे सोपे नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी व्यक्त केले आहे. प्रथम श्रेणीचे केवळ ११ सामने खेळल्यानंतर कोन्सटासला कारकीर्दीत कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. उस्मान ख्वाजाच्या साथीने तो आंतरराष्ट्रीय पदार्पण करेल.

हेही वाचा >>> हिमा दासच्या निलंबन कालावधीवरून गोंधळ

‘‘कोन्सटासमध्ये जबरदस्त प्रतिभा आहे. पंतप्रधान एकादश संघाकडून खेळताना त्याने भारताविरुद्ध शतकी खेळी केली. त्यानंतर लगेच बिग बॅश सामन्यातही त्याने चमक दाखवली. त्याच्याकडे खूप काही आहे. आपल्या प्रतिभेनुसार खेळण्याचा त्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. आता त्याला जगाला आपली प्रतिभा दाखवून द्यायची आहे. पण, त्याच्यासाठी हे पदार्पण वाटते तितके सोपे नाही. जगातील सर्वोत्तम गोलंदाजीसमोर पहिला कसोटी सामना खेळत आहे हे कोन्सटासने विसरू नये’’, असेही पॉन्टिंग म्हणाले.

Story img Loader