सोलापूरच्या संदीप काळेने मुठा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात विजेतेपद पटकावले. त्याने अंतिम लढतीत सांगलीच्या सतीश सूर्यवंशी याच्यावर २-० अशा गुणांनी मात केली. त्याला ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. साईनाथ रानवडे व राहुल खाणेकर यांच्यातील कुस्ती ४५ मिनिटांच्या खडखडीनंतर बरोबरीत सोडविण्यात आली. तानाजी झुंजुरके याने तेजस वांजळे याच्यावर लपेट डाव टाकून निर्णायक विजय मिळवला.

अन्य निकाल-५७ किलो : १.स्वप्नील शेलार, २.अजिंक्य भिलारे. ६५ किलो : १.सूरज कोकाटे, २.बळीराम मारणे. ७० किलो : १.उत्कर्ष काळे, २.संदेश काकडे. ७४ किलो : १.अमित खोपडे, २.रवींद्र करे.

Story img Loader