महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धेत संदीप पाटील, संग्राम पोळ आणि संग्राम ठोंबरे यांनी तिसरा दिवस गाजवला. डिलाइल रोड, ना. म. जोशी मार्गावरील ललित कला भवनाच्या खुल्या मैदानात कुस्तीचा थरार पाहायला मिळाला. कामगार केसरी गटात तात्यासाहेब कोरे साखर कारखान्याच्या संदीप पाटीलने शंकर साखर कारखान्याच्या अभिजीत खुडेला गुणावर पराभूत करून उपांत्य फेरीत आगेकूच केली. वारणा दूधतर्फे खेळणाऱ्या संग्राम पोळने माणगंगा सहकारी कारखान्याच्या विजय देवडकरचा पराभव केला. राजाराम बापू कारखान्याच्या संग्राम ठोंबरेने वसंतदादा साखर कारखान्याच्या सुशांत जाधववर मात केली.

Story img Loader