मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवड समिती अध्यक्षपदी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे पुनरागमन झाले आहे. पाटील यांच्याकडे वरिष्ठ संघाबरोबरच २५ वर्षांखालील संघाचेही अध्यक्षपद देण्यात आले आहे.
एमसीएच्या विविध निवड समित्या पुढीलप्रमाणे-
वरिष्ठ आणि २५ वर्षांखालील : संदीप पाटील (अध्यक्ष), मिलिंद रेगे, संजय पाटील आणि निशित शेट्टी.
१९ वर्षांखालील : रंजन बैनदूर (अध्यक्ष), प्रसाद देसाई, संतोष शिंदे आणि अरुण शेट्टी.
१६ वर्षांखालील : श्रेयस खानोलकर (अध्यक्ष), मिलिंद ताम्हाणे, नीलेश भोसले आणि बिमेश शाह.
१४ वर्षांखालील : रमेश वाजगे (अध्यक्ष), अजित सावंत, प्रशांत सावंत, अमोल भालेकर.
वरिष्ठ महिला : अरुंधती घोष (अध्यक्षा), कल्पना मूरकर, हेमांगी नाईक आणि जयेश दादरकर.
१९ वर्षांखालील महिला : तृप्ती भट्टाचार्य (अध्यक्षा), संगीता कामत, नीलेश पटवर्धन आणि सुरेखा भंडारे.
विद्यापीठ : विनीत मेहता आणि जे. पी. यादव.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा