राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन(एमसीए)च्या निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ‘‘पाटील यांचे राजीनामापत्र माझ्याकडे आले आहे आणि ते मंजूर व्हायचे आहे. आगामी कार्यकारिणी समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल,’’ अशी माहिती एमसीएचे संयुक्त सचिव नितीन दलाल यांनी दिली.
‘‘स्थानिक सामने पाहणे शक्य नसल्यामुळे पाटील यांनी नैतिकतेने विचार करून या जबाबदारीचा त्याग केला आहे,’’ असे दलाल यांनी सांगितले. स्वत: पाटील यांनीही राजीनाम्याची कबुली दिली आहे.
‘‘पाटील यांनी राजीनाम्याबाबत माझ्याशी अद्याप चर्चा केलेली नाही,’’ असे एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले. स्थानिक हंगामाची नुकतीच सांगता झाली असून, मुंबईने यंदा ४०व्या रणजी जेतेपदाला गवसणी घातली.
दरम्यान, एमसीएने भारताचे यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित यांच्याकडे तांत्रिक समितीचे अध्यक्षपद सोपवले आहे. याआधी क्रिकेट सुधारणा समिती कार्यरत होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा