अनुभवी कुमार संगकाराच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ३ बाद ३६१ अशी दमदार सुरुवात केली. कुमार संगकाराने सलामीला येत १४२ धावांची मॅरेथॉन खेळी केली. त्याने १६ चौकार आणि ३ षटकारांची बरसात केली. दिलशानने ५४ धावा करत संगकाराला चांगली साथ दिली. मात्र सोहाग गाझीने त्याला बाद केले. दिलशान बाद झाल्यानंतर संगकाराने लहिरु थिरिमानेच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा थिरिमाने ७४, तर कर्णधार अँजेलो मॅथ्यूज २५ धावांवर खेळत आहेत. सोहाग गाझीने सर्वाधिक ३ बळी घेतले.