Yuzvendra Chahal and Sangeeta Phogat Viral Video : भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. युजवेंद्र चहलला गेल्या अनेक दिवसांपासून भारताकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही, मात्र त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगाट युजवेंद्र चहलला खांद्यावर घेऊन गोल-गोल फिरवताना दिसत आहे. या व्हिडीओतील युजवेंद्र चहलची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने यंदाच्या सीझनमध्ये ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. या डान्स रिॲलिटी शोमध्ये युजवेंद्र चहलने पत्नी धनश्री वर्माला खूप सपोर्ट केला आहे. युजवेंद्र चहलनेही अनेकवेळा चाहत्यांना पत्नी धनश्री वर्माला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगाट ‘झलक दिखला जा’च्या सेटवर मस्तीच्या मूडमध्ये दिसली.

‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोच्या पार्टीदरम्यान, भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगाटने टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलला खांद्यावर उचलून गोल-गोल फिरवले. भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगाटने युजवेंद्र चहलला अशा प्रकारे फिरवले की, ज्यामुळे त्याला चक्कर येताना दिसली. यानंतर युजवेंद्र चहलने हसत संगीता फोगटला थांबण्याचा इशारा केला.

हेही वाचा – Usman Tariq : पाकिस्तानचा ‘मिस्ट्री स्पिनर’ बॉलिंग ॲक्शनमुळे चर्चेत, VIDEO व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी घेतला आक्षेप

या सीझनमध्ये संगीता फोगाटने ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. मात्र, संगीता फोगाट यापूर्वीच ‘झलक दिखला जा’ शोमधून बाहेर पडली आहे. संगीता फोगाट ही ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाची पत्नी आहे. संगीता फोगाट ही राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती आणि महिला कुस्तीपटू गीता फोगाटची बहीण आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangeeta phogat lifts yuzvendra chahal on her shoulders and spinning round video viral on social media vbm