काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘नवी मुंबई महापौर – श्री’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आले नसले तरी दिवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत संग्राम चौगुलेने ‘महाराष्ट्र – श्री’ किताबावर नाव कोरले.  सविस्तर निकाल : ५५ किलो : १. अरुण पाटील, २. नितीन शिगवण, ३. राजेश तर्वे. ६० किलो : १. नितीन म्हात्रे, २. गजानन पालव, ३. अतुल साळुंखे. ६५ किलो : १. महेंद्र देसाई, २.विलास घडावले, ३. संतोष भरणकर. ७० किलो : १. संतोष मुंगसे, २. श्रीनिवास खारवी, ३. विजय जाधव. ७५ किलो : १. सागर कातुर्डे, २. भास्कर कांबळी, ३. स्वप्निल निवालकर. ८० किलो : १. मंगेश वरण, २. सचिन डोंगरे, ३. अनिकेत गवळी. ८५ किलो : १. सागर माळी, २. जगदीश लाड, ३. जिवेश शेट्टी. ८५ किलोपेक्षा अधिक : १. संग्राम चौगुले, २. रेणसु चंद्रन, ३. विराज सरमळकर.
भारत श्री स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर
मुंबई : कोचीमध्ये २२ ते २४ मार्च या कालावधीत होणाऱ्या ‘भारत श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. ‘मिस्टर युनिव्हर्स’ किताबाचा मानकरी आणि काही दिवसांपूर्वीच झालेल्या ‘महाराष्ट्र श्री’ किताबावर नाव कोरणारा संग्राम चौगुले महाराष्टाच्या संघाने आशास्थान असणार आहेत. संग्रामसह सागर कातुर्डे, रेणसु चंद्रन, जगदीश लाड यांच्याकडूनही महाराष्ट्राला मोठय़ा अपेक्षा आहेत. महाराष्ट्रासमोर खरे आव्हान असेल ते सेनादल आणि रेल्वेच्या शरीरसौष्ठवपटूंचे. महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे : अरुण पाटील, गजानन पालव, संतोष मुंगसे, श्रीनिवास खारवी, सागर कातुर्डे, भास्कर कांबळी, सचिन डोंगरे, जगदीश लाड, संग्राम चौगुले, रेणसु चंद्रन आणि दीपक त्रिपाठी. प्रशिक्षक : शरद मारणे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा