आयपीएलमध्ये उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळलेला कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा दिल्लीचा उदयोन्मुख डावखुरा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानच्या बाबतीत बोलत असताना, भारतीय संघाचे माजी गोलंदाज आणि दिल्ली क्रिकेट संघाचे प्रशिक्षिक मनोज प्रभाकर यांनी प्रदीप सांगवान माझे कधीच ऐकत नसल्याचे म्हटले आहे.
“व्यायामाच्या दरम्यान, खांद्याचे स्नायू वाढविण्यावर सांगवान जास्त भर देत होता. याचा परिणाम गोलंदाजीवर होत असल्याने मी त्याला प्रत्येकवेळी मर्यादित व्यायामकरण्याचा सल्ला देत असे पण, त्याने माझे कधीच ऐकले नाही. त्यामुळे तू सामान्य दर्जाचा गोलंदात होशील असेही मी त्याला कित्येकवेळा बजावले.” असे मनोज प्रभाकर म्हणाले. तसेच “सध्या उत्तम शरिरयष्टी बनविणेही क्रिकेटपटूंमध्ये फॅशनच झाली आहे. खेळाडू आपल्या खेळापेक्षा आपण दिसतो कसे? याकडे जास्त लक्ष देताना दिसत आहेत. याचा आयपीएललाही दोष देणे योग्य ठरेल” असेही मनोज प्रभाकर यांनी स्पष्ट केले. तसेच सांगवानला माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही समजावण्याचा प्रयत्न केला नाही याचेही दुख: असल्याचे प्रभाकर म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा