फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरी सामन्यात सानिया मिर्झा आणि तिची सहकारी बेथानी मट्टेक-सँडस् यांनी विजय प्राप्त करत तिसरी फेरी गाठली आहे. त्यांनी अमेरिकेच्या लॉरिन डेविस आणि मेगान मूल्टन लेवी या जोडीवर १-६,६-३,६-० असा विजय मिळविला. सामना एक तास ४१ मिनिटे सरू होता.
सानिया आणि बेथानी यांची पुढील लढत आता क्रमवारित अकराव्या स्थानावर असलेल्या अनास्तासिया पी आणि ल्यूस सफारोवा या जोडीशी होणार आहे. सानियाला याआधीच मिश्र जोडी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मिश्र जोडी सामन्यात ऐसाम-उल-हक कुरेशी आणि कारा ब्लॅक या जोडीने सानिया आणि तिचा स्वीडिश सहकारी रॉबर्ट लिंडस्टेट यांचा पराभव केला होता.
फ्रेंच ओपन: सानिया-बेथानी जोडी तिसऱ्या फेरीत
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरी सामन्यात सानिया मिर्झा आणि तिची सहकारी बेथानी मट्टेक-सँडस् यांनी विजय प्राप्त करत तिसरी फेरी गाठली आहे.
First published on: 04-06-2013 at 04:12 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania bethanie enter third round of french open