सानिया मिर्झा आणि अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सँडस जोडीने ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. डॅनियला हन्तुचोव्हा आणि कतरिना रेबोटनिक जोडीपैकी डॅनियलाने दुखापतीमुळे माघार घेतल्याने सानिया-बेथानी जोडीला विजयी घोषित करण्यात आले.
बिगरमानांकित सानिया-बेथानी जोडी पहिल्या सेटमध्ये ५-१ अशी आघाडीवर होती. त्यावेळी हन्तुचोव्हाने जांघेच्या दुखापतीमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सानिया-बेथानी जोडीने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या लिझेल हुबेर आणि स्पेनच्या मारिया जोस मार्टिनेझ सांचेझ जोडीला ६-२, ६-३ असे नमवले. गेल्या हंगामात बेथानी सँडसला झालेल्या दुखापतीमुळे या जोडीला चांगली कामगिरी करता आली नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा