भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची सहकारी कॅरा ब्लॅक ही जोडी पुढील महिन्यात सिंगापूर येथे होणाऱ्या बीएनपी पारिबास डब्ल्यूटीए वर्ल्ड फायनल्स स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. या स्पर्धेसाठी सानिया पहिल्यांदाच पात्र ठरली आहे तर ब्लॅक हिची ही ११वी वेळ ठरली आहे. ‘‘जगातील सर्वोत्तम जोडय़ांचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. कामगिरीत सातत्य राखण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत,’’ असे सानियाने सांगितले.

Story img Loader