Imran Mirza’s reaction on Sania-Shoaib divorce : माजी कर्णधार शोएब मलिकने सना जावेदशी लग्न केले आहे. त्यांचे हे तिसरे लग्न आहे. याआधी त्याने भारताची आयशा सिद्दीकी आणि टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत लग्न केले होते. २०१० मध्ये सानियासोबत लग्न करण्यासाठी शोएबला आयशाला घटस्फोट द्यावा लागला होता. यानंतर जेव्हा सानियापासूनचे अंतर वाढल्याची बातमी आली, तेव्हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आला की दोघांमध्ये घटस्फोट झाला आहे का?

आता सानियाचे वडील इम्रान मिर्झाच्या एका वक्तव्याने हे संपूर्ण प्रकरण स्पष्ट झाले आहे. घटस्फोट शोएबने नाही तर सानियाने दिला होता. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात सानियाचे वडिल इम्रान म्हणाले, हा ‘खुला’ होता. ‘खुला’ अंतर्गत मुस्लिम महिलेला तिच्या पतीला एकतर्फी घटस्फोट देण्याचा अधिकार आहे. ‘खुला’ची इच्छा फक्त पत्नीच ठेवू शकते. इम्रान मिर्झाचे हे वक्तव्य व्हायरल होत आहे.

‘खुला’ म्हणजे काय?

खुला हा घटस्फोटाचा आणखी एक प्रकार आहे. घटस्फोट आणि खुलामध्ये फरक एवढाच आहे की तो स्त्रीच्या बाजूने घेतला जाऊ शकतो. खुलाच्या माध्यमातून स्त्री तिच्या पतीशी संबंध तोडू शकते. जसे घटस्फोटात, पुरुष आपल्या पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतो, तर दुसरीकडे, खुलामध्ये, पत्नी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेते. ‘कुराण’ आणि ‘हदीस’मध्येही या प्रकारच्या घटस्फोटाचा उल्लेख आहे. ‘खुला’साठी पती-पत्नी दोघांची संमती आवश्यक आहे. खुलाची प्रक्रिया त्यांच्या वैवाहिक जीवनात नाखूष असलेल्या मुस्लिम महिलांना सम्मानजनक आणि प्रतिष्ठित पद्धतीने घटस्फोट घेण्याचा पर्याय प्रदान करते. एकदा हा घटस्फोट मंजूर झाला की, पत्नीला तिची काही संपत्ती परत करावी लागते किंवा तिचे काही हक्क सोडावे लागतात.

हेही वाचा – सानिया मिर्झाला शोएब मलिकच्या लग्नाबाबत आहे माहिती, ‘हा’ फोटो एकदा पाहाच!

शोएब मलिकने केले तिसऱ्यांदा लग्न –

सानिया ही शोएब मलिकची दुसरी पत्नी आहे. यापूर्वी त्याने भारताच्या आयशा सिद्दीकीशी लग्न केले होते. २०१० मध्ये त्याने भारतीय टेनिस स्टार सानियाशी लग्न केले. आठ वर्षांनंतर दोघेही पालक झाले. दोघांना एक मुलगा आहे, त्याचे नाव इझान मिर्झा मलिक आहे. आता दोघेही लग्नाच्या १३ वर्षानंतर वेगळे झाले आहेत. आता शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले आहे. शनिवारी शोएबने सोशल मीडियावर फोटो शेअर करून याची पुष्टी केली.

हेही वाचा – शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा निर्णय…”

कोण आहे सना जावेद?

पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक सना जावेदचा घटस्फोट झाला आहे. तिने २०२० मध्ये उमैर जसवालशी लग्न केले होते. मात्र, दोघे लवकरच वेगळे झाले. त्यानंतर दोघांनीही आपापल्या अकाऊंटवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले. त्यानंतर दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण समोर आले. २८ वर्षीय सना पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

Story img Loader