सानिया-मार्टिनाला जेतेपद; सलग ४० लढतींमध्ये अपराजित
एकत्र खेळताना अद्भुत सूर गवसलेल्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने सेंट पीटर्सबर्ग स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. या विजयासह या जोडीने सलग ४० लढतीत अपराजित राहण्याची किमयाही साधली. एकत्र खेळायला सुरुवात केल्यापासूनचे या जोडीचे हे १३वे तर नव्या हंगामातील चौथे जेतेपद आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने व्हेरा दुश्नेव्हिना आणि बाबरेरा क्रेजेसिकोव्हा जोडीवर ६-३, ६-१ असा विजय मिळवला.
यंदाच्या वर्षांत ब्रिस्बेन आणि सिडनी स्पर्धेचे जेतेपद नावावर करणाऱ्या सानिया-मार्टिना जोडीने वर्षांतील पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीसह जेतेपदाची कमाई केली. गेल्या वर्षी फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या पराभवानंतर सानिया-मार्टिना जोडीने विम्बल्डन आणि अमेरिकन खुली स्पर्धा या ग्रँड स्लॅम जेतेपदांसह गुआंगझाऊ, वुहान, बीजिंग, डब्ल्यूटीए फायनल्स, सिंगापूर या स्पर्धाची जेतेपदे पटकावली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा