फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर भारताची सानिया मिर्झा आणि तिची सहकारी कारा ब्लॅक यांनी आंतरराष्ट्रीय टेनिस क्रमवारीच्या महिला दुहेरी विभागात सहावे स्थान प्राप्त केले आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सानियाचे हे सर्वोच्च स्थान आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया आणि कारा यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. या कामगिरीमुळे या दोघींनी आठ स्थानांची झेप घेत सहावे स्थान पटकावले आहे. इंडोनेशियातील स्पर्धेत उपविजेती ठरलेल्या अंकिता राणाने महिला एकेरीमध्ये २६२वे स्थान पटकावले आहे. पुरुष एकेरीमध्ये सोमदेव देवबर्मनची २३ स्थानांनी घसरण झाली असून तो ११९व्या स्थानावर गेला आहे. पुरुष दुहेरीमध्ये लिएण्डर पेस तेराव्या आणि रोहन बोपण्णा १७व्या स्थानावर आहेत.

Story img Loader