भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा हिने झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅक हिच्या साथीत महिलांच्या दुहेरीचे विजेतेपद राखले आणि टोकियो टोरे पॅसिफिक टेनिस स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्यांनी स्पेनच्या गर्बिन मुर्गुझा व कार्ला सोरेझ नाव्हेरो यांचा ६-२, ७-५ असा पराभव केला. सानिया हिने यंदा अमेरिकन खुल्या स्पर्धेतील मिश्र दुहेरीत ब्राझीलच्या ब्रूनो सोरेस याच्या साथीत अजिंक्यपद मिळविले होते.
सानिया-कारा जोडीला जेतेपद
भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा हिने झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅक हिच्या साथीत महिलांच्या दुहेरीचे विजेतेपद राखले आणि टोकियो टोरे पॅसिफिक टेनिस स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजविले.
First published on: 21-09-2014 at 03:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza and cara black successfully defend tokyo