पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने एक मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांचीही निराशा झाली आहे. वास्तविक, सानियाने तिच्या व्यावसायिक टेनिस करिअरमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सानियाने तिच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे. सानियाने सांगितले आहे की, ती पुढील महिन्यात दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये खेळणार आहे.

ही चॅम्पियनशिप सानियाच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल. ही दुबई टेनिस चॅम्पियनशिप १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हा WTA 1000 कार्यक्रम असेल. या स्पर्धेत सानिया शेवटच्या वेळी तिच्या चाहत्यांना खेळताना दिसणार आहे.

Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
MS Dhoni impressed by Mumbai Ayush Mhatre
MS Dhoni : मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाजाने जिंकले माहीचे मन, IPL 2025 च्या लिलावापूर्वी CSK ने दिली ‘ही’ खास ऑफर
ajit-pawar on sharad pawar
Ajit Pawar on Sharad Pawar : “ते ८५ वर्षांचे अन् मला रिटायर करायला निघालेत”, अजित पवारांची शरद पवारांवर टीका
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
L K Advani Birth day Story
Lal Krishna Advani : लालकृष्ण आडवाणी, टेनिसची मॅच आणि संघाचं सदस्यत्व! काय आहे ‘तो’ रंजक किस्सा?
Sharda Sinha Passes Away :
Sharda Sinha Passes Away : प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
madhuri dixit reveals secret of happy marriage
भावामुळे ओळख, कॅलिफोर्नियात लग्न अन्…; लग्नाला २५ वर्षे पूर्ण होताच माधुरी दीक्षितने सांगितलं सुखी संसाराचं गुपित, म्हणाली…

सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार –

३६ वर्षीय सानिया मिर्झाही दुहेरीत जागतिक क्रमवारीत नंबर १ राहिली आहे. सानियाने गेल्या वर्षीच घोषणा केली होती की ती 2022 च्या अखेरीस निवृत्त होणार आहे. मात्र दुखापतीमुळे ती यूएस ओपन खेळू शकली नाही. अशा परिस्थितीत सानिया मिर्झा या वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. यानंतर ती युएईमध्ये चॅम्पियनशिप खेळून टेनिसला अलविदा म्हणेल.

हेही वाचा – Sania Mirza Retirement : “मला नक्कीच आठवण येईल”, निवृत्तीनंतर भारतीय सानियाची भावनिक पोस्ट

गेल्या वर्षीच निवृत्त होण्याचा बनवला होता प्लॅन –

सानियाने wtatennis.com ला सांगितले की, ‘मागील वर्षी WTA फायनलनंतरच निवृत्ती घेण्याचा विचार केला होता. पण उजव्या कोपराच्या दुखापतीमुळे यूएस ओपन आणि उर्वरित स्पर्धेतून नाव मागे घ्यावे लागले. मी माझ्या अटींवर जगणारी व्यक्ती आहे. यामुळेच मला दुखापतीमुळे बाहेर पडायचे नाही आणि मी अजूनही प्रशिक्षण घेत आहे. दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर मी निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याचेही हेच कारण आहे.
सानिया मिर्झाने पाच महिने डेट केल्यानंतर २०१० मध्ये शोएब मलिकशी लग्न केले होते. आता पाकिस्तानी मीडियामध्ये सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. दोघांचा अधिकृत घटस्फोट झाल्याचा दावाही केला जात आहे.

हेही वाचा – No Ball Issue: इरफान पठाणने अर्शदीपला सुनावले खडेबोल; म्हणाला, ‘कायदे में रहोगे तो…’

सानियाने हे पुरस्कार आणि विजेतेपद पटकावले आहेत –

सानिया मिर्झाला अर्जुन पुरस्कार (२००४), पद्मश्री पुरस्कार (२००६), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१५) आणि पद्मभूषण पुरस्कार (२०१६) ने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सानियाने आतापर्यंत ६ मोठ्या चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत. तिने ऑस्ट्रेलियन ओपन (२०१६), विम्बल्डन (२०१५) आणि यूएस ओपन (२०१५) दुहेरीत विजेतेपद पटकावले आहेत. याशिवाय त्याने मिश्र दुहेरीत तीन ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन (२००९), फ्रेंच ओपन (२०१२) आणि यूएस ओपन (२०१४) विजेतेपदेही जिंकली आहेत.