सानिया मिर्झा आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात जेतेपद पटकावले. या जोडीने अंतिम लढतीत अबिगाइल स्पेअर्स आणि सँटिआगो गोन्झालेझ जोडीवर ६-१, २-६, ११-९ असा विजय मिळवला. सानियाला महिला दुहेरीत मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. मार्टिना हिंगीस आणि फ्लॅव्हिआ पेनेट्टा जोडीने सानिया-कॅरा ब्लॅक जोडीवर ६-२, ६-४ असा विजय मिळवला. स्पर्धेतील अन्य भारतीय खेळाडूंचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे.
 

Story img Loader