सानिया मिर्झाने आपली झिम्बाब्वेची साथीदार कॅरा ब्लॅकच्या साथीने खेळताना पोर्तुगाल खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आगेकूच केली. मात्र सोमदेव देववर्मनला दुसऱ्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. अव्वल मानांकित सानिया-कॅरा जोडीने सिल्व्हिआ सोलर इसपिनोसा-शुआई झांग जोडीवर ६-३, ६-४ असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत या जोडीची लढत अमेरिकेच्या लिझेल ह्य़ुबेर आणि लिसा रेमंड जोडीशी होणार आहे. पुरुषांमध्ये अव्वल मानांकित चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डीचने सोमदेववर ६-३, ६-२ अशी मात केली.

Story img Loader