डब्ल्यूटीए स्पर्धेत सानिया मिर्झा आणि कॅरा ब्लॅक जोडीने उपांत्य फेरीत आगेकूच केली. एकत्रित शेवटची स्पर्धा खेळणाऱ्या सानिया-कॅरा जोडीने अमेरिकेच्या राक्वेल कोप्स-जोन्स आणि अबिगाइल स्पीअर्स जोडीवर ६-३, २-६, १२-१० अशी मात केली. सानिया आणि कॅरा यांनी यापुढे जोडीने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षीपासून सानिया तैपेईच्या स्यू वेई सेइहच्या बरोबरीने खेळणार आहे. दरम्यान, महिला एकेरीत पेट्रा क्विटोव्हाने मारिया शारापोव्हाला ६-३, ६-२ असे नमवत सनसनाटी विजयाची नोंद केली. बुधवारी झालेल्या लढतीत सिमोन हालेपने सेरेना विल्यम्सवर विजय मिळवला होता. सेरेनापाठोपाठ शारापोव्हाचेही आव्हान संपुष्टात आल्याने जेतेपदासाठीची शर्यत चुरशीची होणार आहे. अन्य लढतीत कॅरोलिन वोझ्नियाकीने अ‍ॅग्निेझेस्का रडवानस्कावर ७-५, ६-३ अशी मात केली.

Story img Loader