अनुभवी मार्टिना हिंगिसच्या अनुपस्थितीत केस डेलाअ‍ॅक्वा या नव्या साथीदारासह खेळणाऱ्या सानिया मिर्झाला ऐजॉन क्लासिक टेनिस स्पर्धेत सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले. जि झेंग आणि युंग जान चान जोडीने सानिया-केस जोडीवर ६-४, ६-२ अशी मात केली. वैयक्तिक कारणांमुळे हिंगिस या स्पर्धेत खेळू शकली नाही. मात्र पुढील आठवडय़ात ईस्टबोर्न आणि त्यानंतर विम्बल्डन स्पर्धेत हिंगिस सानियाच्या बरोबरीने खेळणार आहे.

Story img Loader