भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने कारकिर्दीत प्रथमच जागतिक क्रमवारीतील महिला दुहेरीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. पहिल्यांदाच तिने पहिल्या पाच क्रमांकांमध्ये झेप घेतली आहे.
सानिया व तिची झिम्बाब्वेची सहकारी कॅरा ब्लॅक यांना नुकत्याच झालेल्या विम्बल्डन स्पर्धेतील दुहेरीत दुसऱ्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र यंदा अन्य स्पर्धामधील कामगिरीमुळेच तिला पाचवे स्थान मिळू शकले आहे. पाचव्या स्थानाविषयी आनंद व्यक्त करीत सानिया म्हणाली, आजपर्यंत कारकिर्दीत मला अनेक वेळा दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. या पाश्र्वभूमीवर पाचवा क्रमांक हा माझ्यासाठी प्रेरणादायक आहे. महिलांमध्ये भारताच्या अंकिता रैनाने २८५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पुरुष गटात सोमदेव देववर्मन याची १४५ व्या क्रमांकावरून १३५ व्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे.
दुहेरीत लिएण्डर पेसने १३ वे स्थान कायम राखले आहे तर रोहन बोपण्णा याची २० व्या क्रमांकापर्यंत घसरण झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा