भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा पतीपासून विभक्त झाली आहे. तिने पाकिस्तानी क्रिकेटपटू पती शोएब मलिकपासून घटस्फोट घेतला. शोएबने मागच्या आठवड्यात त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर सानिया व शोएबच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं.

शोएबने सना जावेदशी लग्न केलं असलं तरी सानिया व शोएब एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. शोएबने तिसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर सानिया मिर्झाने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली आहे. यात तिचं आरशात प्रतिबिंब दिसतंय, असा फोटो शेअर केला आहे. सानियाने या फोटोला फक्त ‘रिफ्लेक्ट’ या एका शब्दाचं कॅप्शन दिलंय. रिफ्लेक्टचा अर्थ प्रतिबिंब असा होतो.

सानिया मिर्झाचा संसार मोडला, शोएब मलिकने शेअर केले लग्नाचे फोटो; कोण आहे त्याची तिसरी पत्नी सना जावेद?

सानियाच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “या कठीण काळात शांत राहा. जगाला तुमची शांतता कायम लक्षात राहील,” अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. याशिवाय अनेकांनी सानियाबद्दल आदर असल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे.

sania mirza
सानियाच्या पोस्टवरील कमेंट्स
sania mirza
सानियाच्या पोस्टवरील कमेंट्स

दरम्यान, सानिया मिर्झा व शोएब मलिक १३ वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले. त्यांनी २०१० मध्ये लग्न केलं होतं. सानियाने पाकिस्तानी शोएब मलिकशी लग्न केल्याने तिला भारतात विरोधही झाला होता. दोघेही लग्नानंतर दुबईत राहत होते. त्यांना इजहान नावाचा मुलगा आहे.

Story img Loader