शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला आहे. शोएबने अभिनेत्री सना खानशी निकाह झाल्याचे फोटो पोस्ट केले आणि एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासूनच सानिया मिर्झा चर्चेत आहे. सानियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आह. जी पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. शोएब मलिकशी ‘खुला’ (घटस्फोट) झाल्यानंतर सानिया मिर्झा आता एकटी झाली आहे. आता सानिया मिर्झाची पोस्ट कुणालाही भावूक करेल अशीच आहे.

सानिया आणि शोएबचं लग्न २०१० मध्ये झालं होतं

४१ वर्षीय शोएब आणि सानिया मिर्झाचं २०१० साली लग्न झालं होतं. हे शोएबचं दुसरं लग्न होतं. त्याआधी शोएब आणि आयेशा सिद्दीकी यांचा घटस्फोट झाला होता. सानिया आणि सोहराब मिर्झा यांचा साखरपुडा झाला पण लग्न झालं नव्हतं. पाकिस्तानच्या खेळाडूशी लग्न करण्यावरून सानिया मिर्झाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. लग्नानंतर सानिया-शोएब दुबईत राहत होते. ४१वर्षीय शोएब हा पाकिस्तानचा माजी कर्णधार असून ३५ कसोटी, २८७ एकदिवसीय आणि १२४ ट्वेन्टी२० सामन्यात त्याने पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. जगभरात विविध ट्वेन्टी२० लीगमध्ये दहाहून अधिक संघांसाठी तो नियमित खेळतो.

काय म्हटलं आहे सानिया मिर्झाने?

“तुम्ही आठ वर्षांचे असताना डुलकी लागते. जाग येते तेव्हा तुम्ही एका झटक्यात २८ वर्षांचे झालेले असता. त्यानंतर तुम्ही थेट पालक होता. त्यांना तुम्ही आई झालात की तो तुमच्याबरोबर तुमच्यासह असतो. तुम्हाला ते एकच गाणं दहादा एकच गाणं म्हणायला तो सांगतो. जेव्हा तो तुम्हाला मिठी मारतो तेव्हा तुम्हीही त्याला घट्ट मिठी मारता. अनेकदा मूल वाढवत असताना तुमच्या मनावर जास्त ताण येतो. पण तुम्ही तुमचा आत्मा त्याच्यात शोधता याचा आनंद शब्दांत व्यक्त करण्यासारखा नसतो.” असा काहीसा आशय असलेली एक पोस्ट सानियाने तिच्या इंस्टा अकाऊंटवरुन शेअर केली आहे. आपल्या मुलाच्या संगोपनाबाबत तिने ही पोस्ट लिहिली आहे. जी वाचून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल.

हे पण वाचा-“मला वाटतं शोएब मलिक एक दिवस सना जावेदलाही घटस्फोट देईल आणि…”, तस्लिमा नसरीन यांची परखड शब्दांत टीका

१७ जानेवारीच्या दिवशी सानिया मिर्झाने काय पोस्ट केली होती?

सानिया पोस्टमध्ये म्हणते.. ‘लग्न असो किंवा घटस्फोट दोन्ही कठीणच, तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. जाड राहणं कठीण आहे आणि फिट राहणंही कठीण, तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. कर्जात बुडणं कठीण आहे, आर्थिक शिस्त लावणंही कठीण आहे. तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. बोलणं कठीण आहे आणि मौन बाळगणंही कठीण. तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. आयुष्य कधीही सोपं नसतं ते कठीणच असतं. आपण ते आपल्या मेहनीतने निवडतो. त्यामुळे विचार करा आणि मग निवड करा.’ या आशयाची एक पोस्ट सानिया मिर्झाने लिहिली होती. तिच्या पोस्टचा अर्थ शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सगळ्यांना समजला होता. आता तिची नवी पोस्ट सगळ्यांनाच भावूक करणारी ठरली आहे.

Story img Loader