भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कारा ब्लॅक यांना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सहाव्या मानांकित सानिया-ब्लॅक जोडीवर इटलीच्या सारा इराणी आणि रॉबर्टा व्हिन्सी या जोडीने २-६, ६-३, ४-६ अशी मात केली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये सानिया-ब्लॅक यांनी एका क्षणी ४-१ अशी भक्कम आघाडी घेतली होती. पण मिळालेल्या संधीचे सोने करता न आल्यामुळे सानिया-ब्लॅक जोडीला एक तास ४८ मिनिटे रंगलेल्या या मुकाबल्यात हार पत्करावी लागली. सानिया-ब्लॅक जोडीने २४ दुहेरी चुका केल्यामुळे त्यांना विजयाचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. दरम्यान, कनिष्ठ मुलींच्या गटात स्नेहादेवी रेड्डी आणि ध्रुती वेणुगोपाल यांना दुहेरीच्या लढतीत अव्वल मानांकित युक्रेनची अन्हेलिना कॅलिनिना आणि रशियाची इलिझावेटा कुलिचकोव्हा यांच्याकडून १-६, २-६ असे पराभूत व्हावे लागले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा