भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिची स्विस सहकारी मार्टिना हिंगिसचा महिला दुहेरीतील दबदबा कायम असून या जोडीच्या खात्यात एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. सिडनीत डब्ल्यूटीए आंतरराष्ट्रीय महिला दुहेरीत उपांत्य फेरी जिंकून सानिया-मार्टिना जोडीने सलग २९ सामने जिंकण्याचा जागतिक विक्रम केला. याआधी रिकोची गिगि फर्नांडेझ आणि बेलारूसच्या नताशा झवेरेवा या जोडीने १९९४ साली सलग २८ स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता.
सिडनी डब्ल्यूटीए स्पर्धेत गुरूवारी सानिया-मार्टिनाने उपांत्य फेरीत रालुका ओलारू(रोमानिया) आणि यारोस्लावा शेवडोवा (कझाकिस्तान) जोडीवर ४-६, ६-३, १०-८ असा निसटता विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
दरम्यान, गतवर्षाची विजयी घोडदौड याही वर्षी कायम राखत सानिया-मार्टिना जोडीने वर्षाची सुरूवात दमदार केली आहे. गेल्याच आठवड्यात या अव्वल मानांकित जोडीने ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. त्यानंतर आता सिडनीतील स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा करण्यासाठी सानिया-मार्टिना केवळ एक पाऊल दूर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा