अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिलांच्या दुहेरीत खेळताना भारताच्या सानिया मिर्झाने सहकारी मार्टिना हिंगीसच्या साथीने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अग्रमानांकन लाभलेल्या या जोडीने उपांत्यफेरीत नवव्या मानांकित युंगजान चान व हाओ चिंग चान या चीन तैपेईच्या जोडीचा ७-६(५), ६-१ असा पराभव केला. ८५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सानिया-हिंगीस जोडीने चारही ब्रेक पॉईंट जिंकले तर, दोन सर्व्हिस गमावल्या. उपांत्य फेरीत सानिया-हिंगीस जोडीसमोर  ११ व्या मानांकित सारा इर्रानी आणि फलविया पेनेटा या इटालियन जोडीचे आव्हान असणार आहे

Story img Loader