भारताची सानिया मिर्झा हिने मार्टिना हिंगिस हिच्या साथीत रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळविले. तसेच त्यांनी जागतिक क्रमवारीत दुहेरीत पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेतली. सानिया-हिंगिस जोडीने कॅरोलीन गार्सिया व कॅटरिना श्रेबोत्निक यांच्यावर ६-२, ७-६ (७-५) अशी मात केली. या जोडीला स्टुटगार्ट व माद्रिद येथील स्पर्धेतील पराभवानंतर जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान गमवावे लागले होते. त्यांनी या मोसमात इंडियाना वेल्स, मियामी व चार्लस्टोन येथील स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविले आहे. सानिया व हिंगिस यांना येथील अंतिम लढतीत तिमिया बाबोस व क्रिस्तिना मॅल्डेनोव्हिक यांच्याशी झुंजावे लागणार आहे. बाबोस व क्रिस्तिना यांनी उपांत्य फेरीत अॅला कुद्रीयत्सेवा व अनास्ताशिया पॅव्हेलेचेन्कोवा यांचा ६-२, ६-४ असा पराभव केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा