भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार मार्टिना हिंगिस या जोडीने सातत्यपूर्ण कामगिरीचा नजराणा पेश करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला दुहेरीचे विजेतेपद शुक्रवारी पटकावले.
सानिया आणि मार्टिनाने चेक प्रजासत्ताकच्या अँड्रिया हॅलव्हाकोव्हा आणि लुसी हॅरडेका या जोडीचा ७-६, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. चालू मोसमातील सानिया आणि मार्टिना जोडीचे हे पहिले ग्रॅंडस्लॅम आहे. सानिया-मार्टिना जोडीने जुलिया जॉर्जेस आणि कॅरलोलिना प्लिस्कोव्हा या जोडीचा ६-१, ६-० असा पराभव करीत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सानिया-मार्टिना या जोडीचा हा सलग ३६वा विजय ठरला.
ऑस्ट्रेलियन ओपन : सानिया-मार्टिनाला महिला दुहेरीचे विजेतेपद
चेक प्रजासत्ताकच्या अँड्रिया हॅलव्हाकोव्हा आणि लुसी हॅरडेका या जोडीचा पराभव केला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 29-01-2016 at 13:38 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza martina hingis lift 3rd grand slam title