एकत्र खेळायला लागल्यापासून अद्भुत विजयी सातत्य राखणाऱ्या सानिया मिर्झा व मार्टिना हिंगिस जोडीची सलग विजयाची मालिका ४२व्या सामन्यात खंडित झाली. रशियाच्या एलेना व्हेसनिना व दारिया कसाटकिना जोडीने उपांत्यपूर्व फेरीत सलग ४१सामन्यांत अपराजित राहणाऱ्या सानिया-मार्टिना जोडीवर ६-२, ४-६, १०-५ असा विजय मिळवला. ऑगस्ट २०१५मधील सिनसिनाटी स्पर्धेनंतर सानिया-मार्टिना जोडी प्रथमच पराभूत झाली आहे. या विजयी मालिकेदरम्यान सानिया-मार्टिना जोडीने सलग तीन ग्रँड स्लॅम जेतेपदांवर कब्जाही केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा