यि-फॅन शू आणि सायसाय झेंग यांनी तीन सेटपर्यंत दिलेली कडवी लढत मोडित काढत भारताच्या सानिया मिर्झाने स्वित्र्झलडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने डब्ल्यूटीए कतार खुल्या टेनिस स्पध्रेतील विजयासह आपली अपराजित राहण्याच्या पराक्रमात ४१व्या सामन्याची भर घातली. अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने एक तास २४ मिनिटे रंगलेल्या सामन्यात बिगरमानांकित चिनी जोडीचा ६-४, ४-६, १०-४ अशा फरकाने पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीत सानिया-मार्टिनाला पुढे चाल मिळाली होती.

Story img Loader