WPL RCB Mentor Sania Mirza: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाची महिला प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरसीबीने बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची पुष्टी केली. यावर टेनिसपटू सानिया म्हणाली की, “तिला क्रिकेट संघाचा मार्गदर्शक बनण्याची ऑफर मिळाल्याचे काळातच खूप आश्चर्य वाटले होते, पण नंतर तिने ते स्वीकारले.”
आरसीबीच्या ट्विटर हँडलवर असे लिहिले आहे की, “महिलांसाठी भारतीय खेळातील एक अग्रणी, युवा आयकॉन जी तिच्या संपूर्ण कारकिर्दीत निर्भयपणे खेळली आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड दिले, मैदानावर आणि मैदानाबाहेर चॅम्पियन आम्हाला तुझा अभिमान वाटतो,” असा उल्लेख करत आरसीबीने महिला क्रिकेट संघाची मार्गदर्शक म्हणून सानिया मिर्झाचे स्वागत केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मार्गदर्शक बनल्यानंतर सानियाने एका सांघिक मुलाखतीत सांगितले की, “मला थोडे आश्चर्य वाटले, पण मी उत्साहित होते. सुदैवाने किंवा दुर्दैवाने, मी २० वर्षांपासून एक व्यावसायिक खेळाडू आहे. माझे पुढील काम मदत करणे हे आहे. तरुण स्त्रिया आणि युवक. मुलींना असा विश्वास देण्याचा प्रयत्न करणे की खेळ त्यांच्यासाठी करिअरचा पहिला पर्याय असू शकतो.”
रॉयल चॅलेंजर्समध्ये ती काय बदल आणेल असे विचारले असता, मिर्झा म्हणाले की, “कोणत्याही खेळातील दबाव हाताळणे ही सर्वात महत्वाची बाब आहे आणि ती खेळाडूंसोबत त्यांच्या मानसिक पैलूवर काम करेल. ती म्हणाली, “क्रिकेट आणि टेनिसमध्ये खूप समानता आहेत. प्रत्येक खेळाडू सारखाच विचार करतो, त्याच दबावातून ते जातात. फक्त दबाव परिस्थिती हाताळणे, ते स्वीकारणे खूप महत्वाचे आहे. दबाव ही एक खास गोष्ट आहे, जर तुम्ही ती स्वीकारू शकत नाही, तर तुम्ही दबावाखाली चांगले खेळाडू होऊ शकत नाही. सर्वात मोठे चॅम्पियन ते आहेत जे दबाव हाताळू शकतात.”
सानिया पुढे म्हणाली, “खेळाडूंचा हा मानसिक पैलू हाताळण्यासाठी मी मुलींसोबत काम करण्यास उत्सुक आहे. आयपीएलने पुरुष क्रिकेटसाठी जे काही केले ते महिला क्रिकेटसाठी करता आले, तर तरुण मुलींसाठी हा खेळ खेळणे स्वाभाविक ठरू शकते. माझी त्यासाठी निवड केल्याबद्दल मी आरसीबीचे आभार मानते.”
१३ फेब्रुवारी रोजी झालेल्या महिला प्रीमियर लीग लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्मृती मंधानाला ३.४ कोटींमध्ये विकत घेतले आणि या लीगच्या इतिहासात विकली जाणारी ती पहिली खेळाडू ठरली. यासोबतच मंधाना ही लीगमधील सर्वात महागडी खेळाडू आहे. मंधाना व्यतिरिक्त, टीममध्ये सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, रेणुका सिंग आणि रिचा घोष आहेत.