ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित अपिआ आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी आपापल्या साथीदारांसह खेळताना उपांत्य फेरीत आगेकूच केली.
सानियाने अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सँड्सच्या साथीने खेळताना मार्टिना हिंगिस-फ्लॅव्हिआ पेनेट्टा जोडीवर ६-३, ६-३ असा विजय मिळवला. नियमित साथीदार स्यु वेई हेसह ऑस्ट्रेलियन स्पर्धेत एकेरीच्या पात्रता फेरीत खेळत असल्यामुळे सानियाने मॅटेक सँड्सच्या साथीने खेळण्याचा निर्णय घेतला. मॅटेकच्या साथीने खेळताना सानियाने चार जेतेपदांवर कब्जा केला आहे. रोहन बोपण्णाने डॅनियल नेस्टरच्या साथीने खेळताना इटलीच्या सिमोन बोलेली आणि फॅबिओ फॉगनिनी जोडीवर ७-५, ६-३ अशी मात केली. पुढच्या फेरीत या जोडीचा ज्युलियन बेनेटू-एडय़ुअर्ड रॉजर व्ॉसेलिन जोडीशी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा