सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकने तिसरं लग्न केलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केल्याची माहिती दिली. सानिया मिर्झाने अनेक वेळा घटस्फोटाशी संबंधित पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीजला शेअर केल्या होत्या. त्यामुळे ती व शोएब विभक्त झाल्याच्या चर्चा होत्या, मात्र या दोघांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली नव्हती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोएब मलिकने सना जावेदशी तिसरं लग्न केलंय. त्याचं पहिलं लग्न आयशा सिद्दीकीशी झालं होतं. तिला घटस्फोट दिल्यानंतर सानिया मिर्झाशी त्याने २०१० मध्ये दुसरं लग्न केलं होतं. पण हे लग्नही टिकलं नाही आणि आता त्याने सनाशी लग्न केलं आहे. शोएबने सनाशी लग्न केलंय आणि सानियाला त्याबद्दल माहिती होतं अशा चर्चा होत आहेत.

सानिया मिर्झाचा संसार मोडला, शोएब मलिकने शेअर केले लग्नाचे फोटो; कोण आहे त्याची तिसरी पत्नी सना जावेद?

सानिया आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या वर्षभरापासून येत आहेत. या दोघांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही पण ते दोघेही बऱ्याच काळापासून एकत्र दिसले नाहीत. शोएबने शनिवारी लग्नाचे फोटो शेअर केले पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहेत. सहसा सेलिब्रिटी जेव्हा वेगळे होतात तेव्हा एकमेकांना अनफॉलो करतात पण सानिया आणि शोएबने तसं केलं नाही.

सानिया मिर्झा व शोएब मलिक एकमेकांना इन्स्टाग्रामवर करतात फॉलो

दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं नसल्याने शोएब मलिकने लग्न केलं असलं तरी दोघांमध्ये कटुता नसावी असं असं म्हटलं जातंय. कदाचित दोघेही परस्पर संमतीने वेगळे झाले असावे, असे अंदाजही सोशल मीडियावर बांधले जात आहेत. गेल्या वर्षी अशा बातम्या आल्या होत्या की शोएबने सानियाची फसवणूक केलीय कारण तो पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा उमरला डेट करत होता. मात्र, आयशाने या बातम्यांना अफवा असल्याचं म्हटलं होतं.

शोएब मलिकशी दुसरं लग्न केल्यावर अभिनेत्री सना जावेदने केला ‘हा’ मोठा बदल, इन्स्टाग्रामवर…

सानिया आणि शोएबचे लग्न एप्रिल २०१० मध्ये हैदराबादमध्ये झाले होते आणि दोघेही दुबईत राहत होते. त्यांना इजहान नावाचा मुलगा आहे. सानियाने गेल्या वर्षी व्यावसायिक टेनिसला अलविदा केला त्यानंतर ती आता मुलाबरोबर दुबईत व हैदराबादमध्ये राहते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza shoaib malik following each other instagram after cricketer married to sana javed hrc