सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी तिसरं लग्न केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सानिया-शोएबचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. सानियाने घटस्फोटाशी संबंधित अनेक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केल्या होत्या. याशिवाय काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये शोएब-सानियाचं नात संपुष्टात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र या दोघांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर क्रिकेटपटूने शनिवारी (२० जानेवारी) त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
शोएब आणि सानिया मिर्झा २०१० मध्ये विवाहबंधनात अडकले होते. शोएबचं हे दुसरं लग्न होतं. त्याआधी त्याचा आयेशा सिद्दीकीबरोबर घटस्फोट झाला होता. क्रिकेटपटूच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला त्या दोघांमध्ये ‘खुला’ झालेला आहे. असं सांगितलं होतं. ‘खुला’ याचा अर्थ सानियाने शोएबला एकतर्फी घटस्फोट दिलेला आहे असा होतो.
हेही वाचा : Sania-Shoaib Divorce : शोएब मलिकच्या ‘या’ सवयीचा सानियाला व्हायचा त्रास, कुटुंबियांनीच सांगितलं खरं कारण
शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नावर आता सानिया मिर्झाचे कुटुंबीय, बहीण अनम व तिच्या टीमने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. “सानियाने तिचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच सर्वांपासून दूर आणि वेगळं ठेवलं. काही महिन्यांआधीच ती आणि शोएब विभक्त झाले आहेत. त्यांचा घटस्फोट झालेला आहे. शोएबला तिने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सानियाच्या आयुष्यातील हा अतिशय संवेदनशील काळ आहे. त्यामुळे तिच्या सगळ्या चाहत्यांनी प्रायव्हसी जपून तिच्या निर्णयाचा आदर करा.” असं अनम मिर्झाने शेअर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचा : “प्रत्येक पाकिस्तानी क्रिकेटपटूचा आवडता विषय म्हणजे…”, सानिया मिर्झाचा टीव्ही शोमधील ‘तो’ VIDEO व्हायरल
दरम्यान, शोएबची तिसरी पत्नी ३० वर्षीय सना जावेद ही पाकिस्तानातील लोकप्रिय आहे. तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अगदी लहान वयात तिने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करत करिअरला सुरुवात केली होती. शोएब आणि सनाने काही जाहिरातींच्या शूटसाठी एकत्र काम केलं होतं. यादरम्यान त्यांची मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शोएब-सनामध्ये तब्बल १२ वर्षांचं अंतर आहे. याशिवाय सानिया मिर्झाबद्दल सांगायचं झालं, तर तिने टेनिसमधून निवृत्ती घेऊन जवळपास एक वर्ष झालं आहे. तिने आपला शेवटचा विम्बल्डन सामना ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोपण्णाबरोबर खेळला होता.