महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्त्व करणारी सानिया मिर्झा अमेरिकन खुल्या स्पर्धेत चीनच्या जि झेंगच्या साथीत खेळणार आहे. विम्बल्डन स्पर्धेत सानिया अमेरिकेच्या लिझेल ह्य़ुबेरच्या साथीत खेळली होती. मात्र या जोडीला तिसऱ्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. ‘‘एकमेकींचा खेळ समजून घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. बॅकहँड ही तिची ताकद आहे, नेटजवळ ती सुरेख खेळते. आंतरराष्ट्रीय दर्जासाठी किती मेहनत करावी लागते याची तिला जाणीव आहे. तिच्याविरुद्ध एकेरीचे चुरशीचे सामने मी खेळले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिच्याविरुद्ध पराभव झाल्यामुळे माझे पदक हुकले होते, आता तिच्या साथीने जिंकण्याची इच्छा आहे,’’ असे सानियाने सांगितले.

टेनिस क्रमवारीत बोपण्णा तिसऱ्या स्थानी
नवी दिल्ली : विम्बल्डन स्पर्धेत दिमाखदार प्रदर्शन करणाऱ्या रोहन बोपण्णाने जागतिक क्रमवारीतही आगेकूच केली आहे. दरम्यान महेश भूपतीची सातव्या स्थानी घसरण झाली आहे तर लिएण्डर पेस नवव्या स्थानी स्थिर आहे. क्लॅरो टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या दिविज शरणने १८ स्थानांनी आगेकूच करत ६६वे स्थान गाठले आहे.

Story img Loader