मिश्र दुहेरीत लिएंडर पेसबरोबर खेळल्यानंतर आता स्वीत्र्झलडच्या मार्टिना हिंगीसला आणखी एक भारतीय जोडीदार मिळणार आहे. भारतीय महिला टेनिसच्या चेहरा असलेल्या सानिया मिर्झाने महिला दुहेरीकरिता जोडीदार म्हणून हिंगीसची निवड केली आहे.
या मोसमात सानियाने चायनीज तैपेईच्या सू वे सेहच्या साथीने विविध स्पर्धामध्ये भाग घेतला. या जोडीला ऑस्ट्रेलियन ओपन स्पध्रेत दुसरे मानांकन मिळाले होते. मात्र, त्यांना दुसऱ्याच फेरीत स्पध्रेतून बाहेर पडावे लागले. ‘सेहच्या जोडीने खेळताना मला गेल्या पाच स्पर्धामध्ये यश मिळाले नाही. जागतिक दर्जाचे टेनिस खेळताना आमचा ताळमेळ योग्य होत नव्हता. या नंतर मी सर्व प्रकारच्या स्पर्धाचा चांगला अनुभव असलेल्या हिंगीससह मिश्र दुहेरीत खेळणार आहे,’ असे सानियाने म्हटले आहे.
दोन वर्षांंपूर्वी टेनिसमध्ये पुनरागमन केलेल्या स्वीत्र्झलडच्या मार्टिना हिंगीसने लिएंडर पेसच्या जोडीने खेळताना याच वर्षी ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती. सानियाला जागतिक मिश्र दुहेरीत पाचवे तर मार्टिनाला सातवे मानांकन मिळाले आहे.
सानियाने या अगोदर ब्रुनो सोअर्स, साकेथ मायनेनी व कारा ब्लॅक यांच्या जोडीने अनुक्रमे अमेरिकन खुली स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा व डब्ल्यूटीए स्पर्धा यामध्ये विजेतेपद पटकावले होते.
सानिया मिर्झाच्या जोडीला मार्टिना हिंगीस
मिश्र दुहेरीत लिएंडर पेसबरोबर खेळल्यानंतर आता स्वीत्र्झलडच्या मार्टिना हिंगीसला आणखी एक भारतीय जोडीदार मिळणार आहे.
First published on: 06-03-2015 at 12:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza to team up with martina hingis