मिश्र दुहेरीत लिएंडर पेसबरोबर खेळल्यानंतर आता स्वीत्र्झलडच्या मार्टिना हिंगीसला आणखी एक भारतीय जोडीदार मिळणार आहे. भारतीय महिला टेनिसच्या चेहरा असलेल्या सानिया मिर्झाने महिला दुहेरीकरिता जोडीदार म्हणून हिंगीसची निवड केली आहे.
या मोसमात सानियाने चायनीज तैपेईच्या सू वे सेहच्या साथीने विविध स्पर्धामध्ये भाग घेतला. या जोडीला ऑस्ट्रेलियन ओपन स्पध्रेत दुसरे मानांकन मिळाले होते. मात्र, त्यांना दुसऱ्याच फेरीत स्पध्रेतून बाहेर पडावे लागले. ‘सेहच्या जोडीने खेळताना मला गेल्या पाच स्पर्धामध्ये यश मिळाले नाही. जागतिक दर्जाचे टेनिस खेळताना आमचा ताळमेळ योग्य होत नव्हता. या नंतर मी सर्व प्रकारच्या स्पर्धाचा चांगला अनुभव असलेल्या हिंगीससह मिश्र दुहेरीत खेळणार आहे,’ असे सानियाने म्हटले आहे.
दोन वर्षांंपूर्वी टेनिसमध्ये पुनरागमन केलेल्या स्वीत्र्झलडच्या मार्टिना हिंगीसने लिएंडर पेसच्या जोडीने खेळताना याच वर्षी ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती. सानियाला जागतिक मिश्र दुहेरीत पाचवे तर मार्टिनाला सातवे मानांकन मिळाले आहे.
सानियाने या अगोदर ब्रुनो सोअर्स, साकेथ मायनेनी व कारा ब्लॅक यांच्या जोडीने अनुक्रमे अमेरिकन खुली स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा व डब्ल्यूटीए स्पर्धा यामध्ये विजेतेपद पटकावले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा