टेनिस विश्वातील स्टार महिला खेळाडू सानिया मिर्झाने तिचा क्रिकेटपटू पती शोएब मलिकला लग्नाच्या 11व्या वाढदिवसानिमित्त एक खास संदेश लिहिला आहे. सानियाने शोएबसोबतचे  फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ‘‘येत्या काही वर्षांत अशीच इरिटेट करत राहीन”, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.  सानियाने 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये शोएबशी लग्न केले. आता दोघेही पालक झाले आहेत. सानिया आणि शोएबच्या मुलाचे नाव इझान मिर्झा मलिक आहे.

सानिया ही भारताची आघाडीची महिला टेनिसपटू आहे. तर, शोएबने पाकिस्तानकडून 35 कसोटी, 287 एकदिवसीय आणि 116 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 1999मध्ये शोएबने पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने पाकिस्तान संघाचे कर्णधारपदही सांभाळले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

शोएब मलिकची क्रिकेट कारकीर्द जबरदस्त आहे. कसोटीत शोएबने 1898 धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय सामन्यात तो 7534 धावा काढण्यात यशस्वी झाला आहे. शोएबने वनडेमध्ये 9 शतके आणि 44 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय  116 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शोएबने 8 अर्धशतकांसह 2335 धावा केल्या आहेत.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शोएब सहाव्या क्रमांकावर आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या या प्रकारात विराटने 3159 धावा केल्या आहेत.

Story img Loader