नवी दिल्ली : भारताची प्रमुख टेनिसपटू सानिया मिर्झाने दुखापतीमुळे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतून माघार घेतली आहे. टोरंटो येथील कॅनेडियन खुल्या स्पर्धेदरम्यान सानियाच्या कोपराला दुखापत झाली होती.

‘‘चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर दुखापत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. यातून बरे होण्यासाठी तिला किमान एक आठवडा लागणार आहे. अत्यंत कठीण काळातून जात आहे. यामुळे मला निवृत्तीच्या विचारात काही बदल करावा लागेल. अर्थात, अजून निर्णय झालेला नाही,’’ असे सानिया म्हणाली.

टोरंटो स्पर्धेत मेडिसन किजच्या साथीने सानियाने उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर सानिया गेल्या आठवडय़ात सिनसिनाटी खुल्या स्पर्धेतही खेळली. त्यामुळे सानियाची दुखापत आणखी बळावली.

Story img Loader