अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस यांनी आपापल्या दुहेरी सामन्यांत विजय प्राप्त करत अमेरिकन टेनिस स्पर्धेत आगेकूच केली, तर अनुभवी टेनिसपटू महेश भूपतिला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
महिला दुहेरी गटात सानियाने तिची चीनची साथीदार ज्येंग झेईसोबत उत्कृष्ट खेळी साकारत जर्मनीच्या अनिका बेक आणि पुएर्टो रिकान मोनिका पुईगा यांना ६-२, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले आणि स्पर्धेच्या दुसऱया फेरीत धडक मारली आहे. त्याचबरोबर पुरूष दुहेरी गटात लिएंडर पेसने राडेक स्टेपनेकच्या साथीने जार्को निमिनेन आणि दिमित्रि तुर्सुनोव यांचा ६-४, ७-६, ७-४ असा पराभव करत दुसऱया फेरित प्रवेश केला आहे. परंतु, दुसरीकडे महेश भूपती आणि त्याचा जर्मनीचा साथीदार फिलिप पेशनर यांना कॅनडाच्या डेनियल नेस्टर आणि वासेक पोसपिसिल विरुद्धच्या सामन्यात ६-३, ७-६, ७-४ अशा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे भूपतीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा