सानिया मिर्झा, लिएण्डर पेस व महेश भूपती यांचा खेळ पाहण्याची संधी येथील टेनिस चाहत्यांना नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे. नवी दिल्लीत २७ नोव्हेंबर रोजी महान टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा समवेत हे खेळाडू प्रदर्शनीय सामन्यात सहभागी होणार आहेत.

हे चारही खेळाडू देशात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत, तसेच उदयोन्मुख खेळाडूंसाठी मार्गदर्शन शिबीरही घेणार आहेत. कोलकाता, बंगळुरू व हैदराबाद येथेही हे सामने होणार आहेत. सानिया व भूपती यांनी मिश्र दुहेरीत दोन ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवली आहेत. पेस व नवरातिलोव्हा यांनीही अनेक स्पर्धामध्ये मिश्र दुहेरीत अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. पेस व सानिया यांनीच ही कसोटी मालिका आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे समजते. तसेच त्यांनी याबाबत भूपतीबरोबरही चर्चा केली आहे.

प्रत्येक सामना तीन सेट्सचा राहणार असून, दिल्लीतील आर. के. खन्ना स्टेडियमवर सायंकाळी विद्युतप्रकाशात त्याचे आयोजन केले जाणार आहे.

Story img Loader