टी२० विश्वचषक खेळण्यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. भारतीय संघाचे सराव सत्र पर्थमध्ये सुरू झाले आहे, मात्र यावेळी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघासोबत नाही. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. दरम्यान, त्याची पत्नी संजना गणेशन ऑस्ट्रेलियाला पोहोचली असून, ती या मोठ्या आयसीसी स्पर्धेची निवेदक (Anchoring) म्हणून काम करणार आहे.
संजना गणेशन हीने ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टला तिने मी अशा ठिकाणी जात आहे जी लवकरच माझी आवडती होणार आहे. तिच्या या फोटोला अनेकांनी लाईक केले आहे. मात्र काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे. एका चाहत्याने लिहिले की ‘जसप्रीत बुमराह विश्वचषकासाठी जात नाही, मात्र संजना जात आहे.’ तसेच एका चाहत्याने लिहिले, ‘भाभीजी भाईसाहब कहा है?’ तर काहींनी लिहिले की ‘बुमराह कुठे गुमराह झाला.’ एका युजरने ट्वीटमध्ये लिहिले की, भैया भी आते तो अच्छा लगता’.
‘तो’ नाही पण ‘ती’ पोहचली अशी कमेंट करत मिसेस बुमराह अशी चाहत्यांकडून ट्रोल झाली. जसप्रीत बुमराह विश्वचषकासाठी जाऊ शकला नाही, पण संजना जात आहे, असे चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिले आहे. ‘भाभीजी, भाईसाहेब कुठे आहेत’, अशा प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिल्या. तर काहींनी लिहिले की बुमराह दिशाभूल झाला आहे. तिचा पती जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचे झाले तर पाठीच्या दुखापतीमुळे तो टी२० विश्वचषकामधून बाहेर पडला आहे. बुमराह आशिया चषकामध्येही सहभागी झाला नव्हता. त्याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत पुनरागमन केले होते, पण नंतर पुन्हा एकदा दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले.
जसप्रीत बुमराहच्या जागी बदली खेळाडूचा पर्याय सध्यातरी भारतीय संघाने जाहीर केलेला नाही. जसप्रीत बुमराहच्या जागी भारतीय संघात कोणता खेळाडू असेल, याची टी२० विश्वचषकापूर्वी घोषणा केली जाणार आहे. सध्याच्या घडीला त्याच्या जागी मोहम्मद शमीचा मुख्य संघात समावेश केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.