भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या व अखेरची कसोटी खेळला नाही. २८ वर्षीय बुमराह लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे बुमराह स्पोर्ट्स सुत्रसंचालक संजना गणेशननशी लग्न करणार आहे. या संदर्भात दोघांनीही अद्याप मौन बाळगलं आहे. मात्र, अभिनेत्री तारा शर्मा सलुजाने सोशल मीडियावर पोस्ट करत या बातमीवर शिक्कामोर्तब केलंय.

तारा शर्मा सलुजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत जसप्रीत, तारा आणि तिचे मुलं दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ताराने दिलेल्या कॅप्शनमुळे जसप्रीत आणि संजनाच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे. “जसप्रीत आणि संजना तुम्हाला तुमच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. ताराशर्मा शोमधल्या तुझ्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल धन्यवाद, आणि तुम्हाला दोघांना एकत्र ६व्या पर्वात पाहण्यासाठी उत्सुक आहोत. तुझ्या संपुर्ण कुटूंबाला खूप खूप शुभेच्छा.” अशा आशयाचे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

जसप्रीत आणि संजना १४-१५ मार्चला गोव्यात लग्न करणार असल्याची चर्चा आहे. करोनाच्या संकटामुळे मोजक्या आणि जवळच्या लोकांना या लग्नासाठी बोलवण्यात येणार आहे.

Story img Loader