Sanjay Bangar picks squad for World Cup 2023: आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानमध्ये, तर नऊ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना २ सप्टेंबरला कँडीमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी टीम इंडियासाठी ही उत्तम संधी आहे. आशिया चषकासाठी निवडण्यात आलेले बहुतांश खेळाडू विश्वचषकात खेळण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची निवड केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संघाची निवड करताना संजय बांगर यांनी आशिया चषकासाठी निवड न झालेल्या खेळाडूला संघात ठेवले आहे. त्यांनी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे विश्वचषक खेळण्याचा दावेदार म्हणून वर्णन केले आहे. भारताचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी याआधी एकदिवसीय विश्वचषक संघ आशिया कप संघासारखाच असेल याची पुष्टी केली होती. बांगर यांना संघात मोठा बदल करायचा आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या जागी अर्शदीप सिंगला संधी मिळावा.

संघ निवडताना बांगर काय म्हणाले?

बांगरने एका टीव्ही कार्यक्रमात सांगितले की, “माझे स्पेशालिस्ट फलंदाज रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव असतील. त्याचवेळी, मी केएल राहुल आणि इशान किशन यांना विकेटकीपिंगसाठी ठेवीन. फिरकी गोलंदाजीसाठी आणि अष्टपैलू खेळाडूंसाठी, मी अक्षर पटेलला ठेवीन आणि दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांपेक्षा रवींद्र जडेजाला प्राधान्य देईन. भारताच्या आशिया कप संघात युजवेंद्र चहलला स्थान मिळू शकले नाही. बांगरच्या विश्वचषकाच्या यादीतही लेगस्पिनरला स्थान मिळाले नाही.”

हेही वाचा – Asia Cup 2023: बीसीसीआयने पीसीबीचे स्वीकारले आमंत्रण, राजीव शुक्ला रॉजर बिन्नीसोबत पाकिस्तानला होणार रवाना

संजय बांगर पुढे म्हणाले, “एक वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या असेल, तर स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज कुलदीप यादव असेल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग हे चार वेगवान गोलंदाज असतील.” एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा ५ सप्टेंबर रोजी केली जाऊ शकते. तोपर्यंत भारतीय संघ आशिया कपमध्ये दोन सामने खेळला असेल.

हेही वाचा – Title Rights: BCCI होणार मालामाल! प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मिळणार तब्बल ‘इतके’ कोटी रुपये

विश्वचषकासाठी संजय बांगरचा १५ सदस्यीय भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay bangar picks indias 15 member squad for world cup 2023 vbm