Sanjay Manjrekar raise question on Virat Rohit and Jasprit Bumrah rest : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह दिसणार आहेत, जे सध्या विश्रांतीवर आहेत. दरम्यान, दुलीप ट्रॉफीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिल्याने संजय मांजरेकरांनी पोस्ट करुन प्रश्न उपस्थित केले होते. ज्यावर चाहत्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सुनील गावसकर यांनीही याबाबत आक्षेप व्यक्त केला आहे, कारण अशा परिस्थितीत रोहित, विराट आणि बुमराह बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोणत्याही कसोटी सामन्याचा सराव न करता खेळतील. यावर आता संजय मांजरेकर यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
संजय मांजरेकर यांनी लिहिले, ‘भारताने गेल्या पाच वर्षांत एकूण २४९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि या काळात रोहित शर्मा ५९ टक्के, विराट कोहली ६१ टक्के आणि बुमराह केवळ ३४ टक्के खेळला आहे. मला वाटतं तिघांनाही इतर खेळाडूंच्या तुलनेत भरपूर विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे त्यांची दुलीप ट्रॉफीसाठी निवड करता येऊ शकली असती.’ यानंतर चाहत्यांनी मांजरेकरांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा – Zaheer Khan : झहीर गुरुजी देणार लखनौला शिकवणी; गौतम गंभीरच्या जागी नियुक्ती
संजय मांजरेकरांना चाहत्यांनी दिले प्रत्युत्तर –
एका युजरने लिहिले की, वर्कलोड हे केवळ खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या संख्येवरून ठरवले जात नाही, उदाहरणार्थ, विश्वचषक सामन्यांमध्ये द्विपक्षीय मालिका सामन्यांपेक्षा जास्त वर्कलोड असतो.