Sanjay Manjrekar Picks Possible Playing XI for Ind against Pak: आशिया चषक २०२३ सुरू होण्यास आता फक्त एक आठवडा बाकी आहे. खंडातील या मोठ्या स्पर्धेसाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. सोमवारी, या स्पर्धेसाठी १७ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये संजू सॅमसनची बॅकअप यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत भारत २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? यावर माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी आपला अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका कार्यक्रमात मांजरेकर यांनी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन सांगितली आहे. या संघात डावखुरा फलंदाज म्हणून टिळक वर्माची निवड करण्यात आली आहे. नुकतेच टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माने आपल्या फलंदाजीने निवडकर्त्यांची मने जिंकली आहेत. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर आपला फलंदाज शोधत होती. पण एकही चेहरा इथे फिट बसणारा दिसत नव्हता.

आता नुकतेच टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माने आपल्या आत्मविश्वासपूर्ण फलंदाजीने या पदासाठी आपला दावा केला. तो डावखुरा फलंदाज आहे, त्यामुळे भारतीय संघाच्या फलंदाजीला एक विशेष प्रकारचा समतोल साधता येतो. पण तिलकला पदार्पणाची संधी मिळण्यापूर्वी श्रेयस अय्यरही तंदुरुस्त झाला आहे. तसेच तो संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्यास उत्सुक आहे.

हेही वाचा – Asia Cup 2023 पूर्वी मोहम्मद शमीच्या अडचणी वाढल्या, पत्नीसोबतच्या वादावर कोर्टाने दिला ‘हा’ आदेश

दरम्यान, ५८ वर्षीय मांजरेकरने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनला सांगितले आहे. त्याच्या मते, या सामन्यात तिलक वर्माला पदार्पण करण्याची संधी मिळणार नाही आणि संघ व्यवस्थापन श्रेयस अय्यरवरही विश्वास ठेवू इच्छित आहे. याशिवाय, मांजरेकरने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुलला स्थान दिले आहे, जो अजूनही दुखापतीच्या समस्येशी झुंजत आहे.

भारत आणि पाकिस्तान संघ पल्लीकलमध्ये आपला पहिला सामना खेळणार आहेत. श्रीलंकेच्या खेळपट्ट्या सहसा फिरकीपटूंना अनुकूल असतात, पण इथे मांजरेकरने भारताच्या गोलंदाजीत तीन वेगवान गोलंदाजांचाही समावेश केला आहे. त्याने दोन फिरकीपटूंची निवड केली आहे, ज्यामध्ये कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांची निवड केली आहे. मात्र, अक्षर पटेलला या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही.

हेही वाचा – Asia Cup 2023 पूर्वी भारताच्या मधल्या फळीची समस्या संपली! श्रेयस अय्यरची सराव सामन्यात वादळी खेळी

संजय मांजरेकरच्या मतानुसार आशिया कपमधील भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay manjrekar selected team indias probable playing xi for match against pak in asia cup 2023 vbm