माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अनुभवी फलंदाज सुरेश रैनाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सुरेश रैना खराब फॉर्ममध्ये आहे आणि त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले पाहिजे, असे मांजरेकर म्हणाले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई संघ सध्या दमदार फॉर्मात असून तो आज कोलकाताशी सामना खेळत आहे.

केकेआर आणि सीएसके यांच्यातील सामन्याचे पूर्वावलोकन करताना मांजरेकर म्हणाले, “चेन्नई सुपर किंग्जसाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांचे दोन दिग्गज खेळाडू सुरेश रैना आणि अंबाती रायुडू फॉर्ममध्ये नाहीत. रैनाचा फॉर्म खराब आहे. पण मी या दोन खेळाडूंपैकी रायडूची निवड करेन. चेन्नई कागदावर खूप मजबूत संघ असल्याचे दिसते. जेव्हा तुम्ही ड्वेन ब्राव्होला आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर येताना पाहता, तेव्हा हे दिसून येते की संघात किती खोलवर फलंदाजी आहे.”

हेही वाचा – CSK vs KKR: शानदार..जबरदस्त…! चेन्नईच्या डु प्लेसिसनं सीमेवर घेतला अप्रतिम झेल; पाहा VIDEO

”अबुधाबीमध्ये फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतात आणि इम्रान ताहिर किंवा कर्ण शर्मा या दोघांचा समावेश केला जाऊ शकतो. जरी मला वाटत नाही की इम्रान ताहिरला स्थान मिळेल. त्यामुळे सुरेश रैनाला वगळून कर्ण शर्माला समाविष्ट केले पाहिजे आणि रवींद्र जडेजाला फक्त फलंदाज म्हणून खेळवले गेले पाहिजे”, असे मांजरेकरांनी या सामन्याअगोदर म्हटले होते.

धोनीने कोलकाताविरुद्ध संघात फक्त एक बदल केला आहे. त्याने दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी ब्राव्होला विश्रांती दिली असून त्याच्याजागी सॅम करनला संधी दिली आहे.

Story img Loader