LSG Owner Sanjeev Goenka Statement After Retention: आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघांनी त्यांचे रिटेन केलेले खेळाडू जाहीर केले आहेत. रिटेंशनपूर्वी केएल राहुलला लखनौचा संघ रिलीज करणार अशी जोरदार चर्चा होती. शेवटी ही चर्चा खरी ठरली आणि रिटेंशन यादीत लखनौ संघाने केएल राहुलला सामील केलं नव्हतं. लखनौ सुपर जायंट्स म्हणजेच एलएसजीने पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या तीन हंगामात केएल राहुल संघाचा कर्णधार होता, परंतु गेल्या वर्षी मैदानावर राहुल आणि संघ मालक संजीव गोयंका यांच्यात थोडाफार मतभेद झाला होता. संघमालक थेट मैदानावरच केएल राहुलवर भडकताना दिसले. ज्यामुळे संघात फूट पडल्याची चर्चा होती. पण नंतर दोघेही एकत्र दिसले होते. संजीव गोयंका यांनी रिटेन्शन दरम्यान दिलेल्या वक्तव्याचाही केएल राहुलशी संबंध जोडला जात आहे.

हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी

एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांनी स्टार स्पोर्ट्सवर सांगितले की, आम्हाला संघात अशा खेळाडूंना रिटेन करायचं होतं ज्यांच्यामध्ये सामना जिंकण्याची मानसिकता असंल आणि त आपल्या वैयक्तिक ध्येयापेक्षा संघाला प्राधान्य देतील. आम्हाला शक्य तितके जिंकायचे आहे.” गेल्या काही हंगामात केएल राहुलचा स्ट्राईक रेट चिंतेचा विषय आहे. त्याने संघासाठी धावा केल्या आहेत, परंतु त्या सामन्यांमध्ये संघाचा बहुतेक वेळा पराभव झाला आहे.

संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूची निवड अवघ्या २ मिनिटांत झाली. त्यानंतर दोन अनकॅप्ड खेळाडूंना आम्ही रिटेन केलं आहे, जे मोहसीन खान आणि आयुष बदोनी आहेत, असंही संजीव गोयंका म्हणाले.

हेही वाचा – Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO

एलएसजीने कायम ठेवलेल्या पाच खेळाडूंमध्ये निकोलस पूरन, रवी बिश्नोई आणि मयंक यादव हे कॅप्ड खेळाडू आहेत, तर मोहसिन खान आणि आयुष बडोनी हे अनकॅप्ड भारतीय आहेत. संघाने निकोलस पुरनवर २१ कोटी रुपये खर्च केले आहेत, तर रवी बिश्नोई आणि मयंक यांच्यावर प्रत्येकी ११ कोटी रुपये खर्च केले आहेत. मोहसीन आणि आयुष यांना प्रत्येकी ४ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी केएल राहुलला लखनौ सुपर जायंट्सने ड्राफ्टमध्ये निवडले होते.

लखनौ सुपर जायंट्स

रिटेन केलेले खेळाडू
निकोलस पुरन – २१ कोटी
रवी बिश्नोई – ११ कोटी
कुलदीप यादव – ११ कोटी
मोहसीन खान – ४ कोटी
आयुष बदोनी – ४ कोटी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjeev goenka lsg owner statement after ipl 2025 retention said team wanted to retain players who have mindset to win kl rahul bdg